नवी दिल्ली, 30 एप्रिल : ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या 100 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले की, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम ‘स्व ते संपूर्ण’ आणि अहं ते वयंचा प्रवास आहे. मन की बात हा त्यांच्यासाठी आध्यात्मिक प्रवास बनला आहे.
यावेळी त्यांना त्यांचे मार्गदर्शक लक्ष्मणराव इनामदार यांची आठवण झाली. पंतप्रधान म्हणाले की, मन की बात हे इतरांचे गुण शिकण्याचे माध्यम बनले आहे. वकिल साहेब (लक्ष्मणराव जी) नेहमी म्हणायचे की आपण इतरांच्या गुणांची पूजा केली पाहिजे. प्रतिस्पर्ध्याचे चांगले गुण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शिकले पाहिजे, असे ते म्हणायचे. हे त्याच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.