कल्याण : कल्याणचा विकास चोहोबाजूंनी होत आहे. त्यातच आता भर पडलीय नव्या अद्यावत हॉस्पीटलची. कल्याणरांच्या सेवेसाठी नवीन अद्ययावत सुसज्ज असे ४० बेड चे ओएसिस हॉस्पिटल सुरू झाले आहे. कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते नव्या हॉस्पिटलचे उद्घाटन पार पडलं. विशेष म्हणजे या हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांसाठी खास १० बेड राखीव ठेवून कमीत कमी खर्चात त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे हॉस्पिटल मॅनेजमेंटकडून सांगण्यात आले.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी येथील डीबी चौक येथे ओएसिस हॉस्पिटल सुरू करण्यात आलं आहे. हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिअटर (ओटी) चे उद्घाटन आयएमएचे माजी प्रेसिडेंट डॉ. प्रशांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक अर्जुन भोईर, नगरसेवक जयवंत भोईर, नगरसेवक सुनील वायले, आयएमए प्रेसिडेंट डॉ. ईशा पानसरे, उद्योजक दीपक भंडारी, उद्योजक मच्छिंद्र जाधव आणि अनेक नामवंत डॉक्टर उपस्थित होते.

या हॉस्पिटलमध्ये अकरा बेड आयसीयू चे , २ ओ टी व १ लेबर ओ टी, भाजलेल्या रुग्णासाठी स्पेशल वॉर्ड, २४ तास मेडिकल व पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा येथे असणार आहेत. हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाकार प्रणव भांबुरे यांनी केले. फिजिशियन डॉ. दयानंद ढेकणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. राजेश पाखरे, प्लास्टिक सर्जन डॉ. पराग तेलवणे, ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गणेश शिरसाठ अशा कल्याण मधील चार सुप्रसिद्ध डॉक्टरांनी मिळून ओएसिस हॉस्पिटल सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!