नोटाबंदीविरोधात भिवंडी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचा कँडल मार्च
भिवंडी – नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष झाल्याने त्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्यावतीने काळा दिवस पाळण्यात आला. भिवंडी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्यावतीने कँडल मार्च काढून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.
शहरातील बागेफिरदोस मशीद पासून नेहरु चौक पर्यंत कँडल मार्च काढून मोदी सरकारने घेतलेल्या नोटा बंदीचा निषेध करण्यात आला. यावेळी कँडल मार्चमध्ये काँग्रेस अल्पसंख्याक भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष सुजाउद्दीन अन्सारी , प्रदेश सदस्य सलाम शेख , महाराष्ट्र प्रदेश महिला सरचिटणीस रुकसाना कुरेशी , नेते इरफान पटेल आदी बहुसंख्य कार्यकर्त्यांचे सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहिर केलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळया पैशाला आळा बसलेला नाही. नोटाबंदीमुळे गरीब जनता देशोधडीला लागली तर तरूणांचा रोजगारही गेला असा आरोप भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष सुजाउद्दीन अन्सारी यांनी करून भाजपचा निषेध केला.