मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात उष्माघातामुळे आत्तापर्यंत 50 च्या हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सरकार मृतांचा आकडा लपवते असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.त्यामुळे सरकार कोंडीत सापडलं आहे
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. अरुणात हाच कार्यक्रम घेतल्याने उष्माघातामुळे 13 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे तर अनेक जण कामोठे येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र जे मृत्यू झाले ते उष्मघातामुळे नव्हे तर चेंगराचेंगरीमुळे झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी केली असतानाच आता संजय राऊत यांनी देखील शिंदे, फडणवीस सरकावर गंभीर आरोप केले आहेत. पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडावर बोलणारे आता गप्प का? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला आहे.. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.