मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पााहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे अकरा श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. सरकारवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधकांकडून होत असतानाच आता सरकारच्या कारभारावर सर्वसामान्य जनतेत तीव्र अतीभोवतीच्या नाराजी पसरली आहे. सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यानां माफी नकोच ….अशीच तीव्र भावना सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होताना दिसत आहे.

स्वतः थंड मंडपात बसुन लाखो लोकांना रखरखत्या उन्हात बसायला लावले हे योग्य आहे का? त्यांना तापमानाची कल्पना नव्हती का? की त्यांना हा सोहळा म्हणजे EVENT करायचा होता का? हेच जर इतर पक्षा मुळे झाल असत तर हेच लोक रस्त्यावर उतरून आंदोलन केली असती आज इतक्या श्री सदस्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार? 5 लाख रुपये देऊन खरच त्यांचे कुटुंब नीट आयुष्य जगू शकतील का? आत्ता पर्यंतचे सगळे पुरस्कार हे उघड्यावर झाले का? सरकार मधील अनुभवी मंत्री, अधिकारी, यापैकी कोणालाही सध्याच्या परिस्थितीतची जाणीव नव्हती का? असे अनेक सवाल सामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

लाखो लोकांच्या सुविधे कडे दुर्लक्ष करुन राजकीय फायदा कसा होईल याकडे लक्ष ठेवणार्‍या राजकीय पक्षांचा सगळ्यानी निषेध करून कायम स्वरूपी राजकारणापासून बाहेर केल पाहिजे, सर्वसामान्य लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणालाही माफ़ी नकोच, याची शिक्षा मिळालीच पाहिजे अशी भावना सामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!