नोटबंदीच्या वर्षपूर्तीनंतरही भिवंडीतील यंत्रमाग नगरीची अर्थव्यवस्था कोमातच ; काँग्रेसने पाळला काळा दिवस
भिवंडी : मोदी सरकारने नोटाबंदी करुन १ वर्षाचा कालावधी उलटला आहे.मात्र एका वर्षानंतरही भिवंडी यंत्रमागनगरीची अर्थव्यवस्था कोमातून बाहेर आलेली नाही.असा आरोप करीत भिवंडी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शोऐब गुड्डू यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीच्या विरोधात भिवंडीतील आनंद दिघे चौकात बुधवारी काळा दिवस पाळण्यात आला. यावेळी भिवंडी महापालिकेचे महापौर जावेद दळवी यांनी सांगितले कि मोदींनी एक वर्षपूर्वी नोटबंदी जाहीर करतेवेळी दिलेल्या भाषणाची आठवण करून देत भिवंडीच्या आनंद दिघे चौकात आणून मोदींना शीक्षा देण्यास शहरातील जनता तयार असल्याचा इशारा दिला.नोटाबंदीमुळे या यंत्रमाग नगरीची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून जवळपास ८० ते ९० टक्के यंत्रमाग व्यवसाय डबघाईला आला आहे.यामुळे काँग्रेस मोदी सरकार विरोधातील लढा अधिक तीव्र करणार असल्याचा ईशारा भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष शोऐब गुड्डू यांनी दिला आहे.मागील वर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे १ हजार आणि ५०० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता.तेव्हापासून या भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून ती एक वर्षानंतरही सावरलेली नाही.त्याच निषेधार्थ तसेच नोटाबंदीच्या या वर्षपूर्तीच्या निमित्ताने काळा दिवस जाहीर करून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी खासदार सुरेश टावरे ,माजी आमदार रशीद ताहीर, मोहमद आली खान,कुणबी सेना प्रमुख व कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ पाटील,स्थायी समिती सभापती इमरान वली मोहमद खान,गटनेते प्रशांत लाड,प्रदेश सरचिटणीस गुरुनाथ टावरे,पप्पू राका,ज्येष्ठ काँग्रेस नेते तुफेल फारुकी ,इकबाल सिद्दीकी राणी अग्रवाल,नगरसेवक अरुण राऊत ,मुख्तार खान ,सिराज ताहीर मोमीन ,मलिक नजीर मोमीन ,जाकीर मिर्जा ,दानिश अंसारी ,वसीम अंसारी,सचिव परवीन खान ,जावेद खान ,सुफियान शेख आदींसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.