मुंबई दि. 08 – अदानी उद्योगा समुहा प्रकरणी सर्व विरोधक जे.पी.सी. मागणी करीत असतांना सर्व विरोधकांच्या मागणीला छेद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जे.पी.सी. ची मागणी योग्य नसल्याचे मत मांडले आहे. या शरद पवारांनी घेतलेल्या भुमिकेचे आपण स्वागत करीत असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री. रामदास आठवले यांनी केले. मुंबईत चुनाभट्टी येथे रिपाइं च्या मेळाव्याची पूर्वतयारी ची पाहणी करण्याकरीता आले असता रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
टाटा बिर्ला समुहांनी जसे देषाच्या विकासात योगदान दिले आहे तसेच अदानी समुहाने विज आणि अन्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे अदानी समुहाला लक्ष्य करणे योग्य नाही. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे. पण पुरावे नसल्यास आरोप करणे चुकीचे आहे. परदेशी कंपनीने आपल्या देशातील एका उद्योग समुहावर केलेल्या आरोपांना महत्व देणे योग्य नाही. ही जेष्ठ नेते शरद पवारांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे, असे मत आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.