भिवंडीत शेतक- याने पीक जाळले : सरकारी अनास्था कायमच
भिवंडी – परतीच्या पावसामुळे सर्वत्र भातपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे , हातातोंडाशी आलेला घास डोळ्यादेखत हातातून जात असताना शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे , त्यामध्ये सरकारी यंत्रणेच्या अनास्थेमुळे भिवंडी तालुक्यातील शिरोळे गावातील शेतकरी नारायण पाटील यांनी उभे भातपीक जाळले आहे , भातशेतीचे नुकसान , त्यामध्ये भातावर पडलेला खोडकीडा अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या नारायण पाटील या शेतकऱ्यानी आपले भातपिक जाळून राग व्यक्त केला आहे , मात्र याची शासन गंभीर दखल केव्हा घेणार असा प्रश्न शेतकऱ्याला पडला असून ग्रामसेवक घरात बसून पंचनामे करत आहेत तर फोटो तुम्ही काढून आणून द्या असा सज्जड दम अधिकारी देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आहे .