ठाण्यात घरगुती सिलिंडर स्फोटात चारजण जखमी
ठाणे : येथील पाटीलवाडी परिसरातील राधाबाई चाळीतील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली या स्फोटात दगडू जाधव वय ६० दर्शना जाधव वय ५० प्रीती जाधव वय २४ आणि तृप्ती जाधव वय ४० हे चौघेजण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिलिंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाल्यानेच हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. या स्फोटामुळे दगडू जाधव यांच्या घराची भिंत कोसळली. तसेच घराच्या भिंतींना तडेही गेले. त्यावरूनच स्फोटाची तीव्रता जाणवते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.