पालिकेच्या शाळेत  विद्यार्थीदिनी शालेय  साहित्याचे वाटप 
नवीन गणवेश मिळाल्याने विद्यार्थी आनंदीत    
  डोंबिवली :-   पश्चिकडील स्टेशनसमोरील पालिकेची शाळा क्र. ८४ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे  या शाळेत  विद्यार्थी  दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जय मल्हार महिला मंडळ आणि दक्षता समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या दिवशी विद्यार्थ्यांना पालिकेने नवीन गणवेश  दिले .
  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  ७ नोव्हेंबरला १९०० या दिवशी साताऱ्यातील  प्रतापसिंग हायस्कुल येथील शाळेत प्रवेश घेतला होता. डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन म्हणून आजच्या दिवशी राज्यातील  सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी  दिवस साजरा करण्यात आला.  पालिकेची शाळा क्र. ८४ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शाळेत हा दिवस साजरा करताना   ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या काशीबाई जाधव,  ऍड      प्रदीप  बाविस्कर , अनिरुद्ध कुलकर्णी , आशा  तडवी , सुरेखा कोरपे, लता नाडलेकर , मैनाताई भोईर , मीनाक्षी क्षणए, चंद्रकांत दिवेकर , सौरभ जोशी , शाळेच्या मुख्याध्यपिका दीपाली परदेशी  , माजी मुख्याध्यपिका  प्रतिभा रानडे , शिक्षक मयूर मावकर  आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी काशीबाई जाधव यांनी या दिवसांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. तर प्रदीप बाविस्कर यांनी हे विद्यार्थी देशाचे  भविष्य असून त्यांना शालेय शिक्षण घेत असताना योग्य सोयी – सुविधा मिळाल्या पाहिजेत असे यावेळी सांगितले. यावेळी   पालिकेच्या वतीने या विद्यार्थ्यांना नवीन णवेश देण्यात आला. या शाळेची पटसंख्या ४० पेक्षा जास्त असूनपाच विद्यार्थी कोन  गावातून तर दोन विद्यार्थी दिवा शहरातून शिकण्यासाठी या शाळेत येत असतात.
  विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी रिक्षा प्रवास … . 
डोंबिवली पश्चिमेकडील सिद्धार्थ नगर झोपडपट्टी येथील काही विद्यार्थ्यांना  दररोज त्यांच्या घरातुन शाळेत रिक्षाने जाण्याची आणि पुन्हा त्यांना घरी सोडण्याची जबाबदारी या शाळेतील शिक्षकवर्ग रिक्षाने करत असतात. हा  खर्च शिक्षणाच्या खिश्यातुन होत असला तरी शाळेतील दरवर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचे मुख्याध्यपिका दीपाली परदेशी यांनी  सांगितले. माजी मुख्याध्यापिका प्रतिभा रानडे या सेवानिवृत्त असल्या तरी आजही  त्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *