मीरा NX हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटर प्रमुख महिला कर्मचारीचा संशयास्पद मृत्यु ; हॉस्पिटल प्रशासन वादाच्या भोव-यात  

उल्हासनगर  : येथील कैम्प नंबर 3 परिसरात असलेल्या मीरा NX या हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षापासुन ऑपरेशन थेटरच्या इंचार्ज म्हणुन काम पहात असलेल्या प्रतिभा जालिंदर भागवत या 32 वर्षीय महिलेचा संशयस्पद मृत्यु झाला आहे. सदर महिलेचा मृत्यु हा हॉस्पिटलमध्येच झाला असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर कैम्प नंबर 3 येथील मीरा हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रतिभा भागवत या गुरुवारी नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कामावर आल्या होत्या, मात्र त्यांना ऑपरेशन थेटरमध्ये चक्कर आल्याने त्यांना त्याच रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते. प्रतिभा यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले, मात्र यावर प्रतिभाच्या नातेवाईकांचा विश्वासच बसत नव्हता. याबाबत प्रतिभाचा भाऊ गणेश याने पोलिस ठाण्यात जावून माहिती देखील दिली होती, मात्र पोलिसांनी देखील आपले म्हणणे ऐकले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान सोमवारी सायंकाळी प्रतिभा यांचा मृत्यु झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने देताच प्रतिभाच्या नातेवाईकांवर दुःखचा डोंगर कोसळला आहे. प्रतिभा ही स्वभावाने खुप चांगली होती, तीचे कोणासोबतच वैर नव्हते. त्यामुळे तिने आत्महत्या करने शक्यच नसल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिच्या या मृत्युला हॉस्पिटल प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप प्रतिभाचा भाऊ गणेश आणि पती जालिंदर यांनी केला आहे. दुसरीकडे जो पर्यंत प्रतिभाच्या मृत्युचे कारण आम्हाला समजत नाही, तसेच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यन्त आम्ही प्रतिभाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा तिच्या नातेवाईकांनी घेतल्याने हॉस्पिटल प्रशासन चांगलेच अडचणीत सापडले आहे. याबाबत हॉस्पिटल प्रशासनाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *