तो पत्ता करतो गुल, हाय आमचा नेता लय पावरफूल

सदाभाऊंच्या समर्थकांचा गाण्यातून शेट्टींना टोला

मुंबई (संतोष गायकवाड ) : राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यात बिनसल्यानंतर शेतकरी संघटनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच चढाओढ लागलेली असते. सदाभाऊंच्या समर्थकांनी चक्क ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांच्या आवाजातील एका गाण्यावर सदाभाऊंची व्हिडीओ क्लीप तयार केलीय. तो पत्ता करतो गुल, हाय आमचा नेता लय पावरफुल..अशा प्रकारचे हे गाण आहे. सध्या हे गाण सोशल मिडीयावर चांगलच व्हायरल झालय, मात्र या गाण्यातून सदाभाऊ समर्थकांना राजू शेट्टींना टोला हाणलाय.

स्वाभिमानी संघटनेतील राजू शेट्टी-सदाभाऊ खोत ही जोडी गेली दीड-दोन दशके प्रत्येक आंदोलनात खांद्याला खांदा लावून लढताना दिसली. मात्र काही दिवसांपूर्वीच दोघांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला.  राज्यातील युती सरकारमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेत पडत रयत क्रांती संघटनेची स्थापना केलीय. आता संघटनेची पाळेमुळे संपूर्ण राज्यात रुजवण्यासाठी सदाभाऊ जोरदार तयारीला लागलेत. त्यामुळे स्वाभिमान विरूध्द रयत असाच सामना रंगलेला दिसत आहे.   शेतक-यांना कोणतही आंदोलन न करता ऊसाचा तिढा सुटल्याने या गाण्याच्या माध्यमातून सदाभाऊ आणि सरकारचे अभिनंदन करण्यात आलय.

गाणे ऐकण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!