सुप्रिया सुळेंच्या टि्विटनंतर सरकार लागले कामाला
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचे सेल्फी ट्वीटरवर पोस्ट करून राज्य सरकारची रस्त्यांच्या बाबतीत उदासीनता चव्हाट्यावर आणल्यानंतर सरकारच्या खड्डे बुजविण्याच्या कामाला गती आलीय. रस्यावरील खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मंत्रालयातच वॉर रुमची स्थापना केलीय.
खासदार सुप्रिया सुळे यांनी कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांसोबत सेल्फी काढले आणि ट्वीटरवर पोस्ट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी राज्याचे महसूल मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही टॅग केल होत. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरची डेडलाइन दिलीय. वॉर रूमच्या माध्यमातून दररोज किती मार्गावरचे खड्डे बुजवले याचा आढावा घेण्यात येणार आहे. खड्डे मुक्त रस्त्याच्या कामावर मंत्रालयातील १५ अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. महाराष्ट्रात 96,000 किमीपर्यंतचे रस्ते असून त्यावर एकही खड्डा दिसणार नाही असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय. सध्या खड्डे भरण्याचे काम जोरदारपणे सुरू आहे.