महाडमध्ये वीरेश टूर्स च्या कार्यालयाचे उद्घाटन
महाड – महाडमधील तुषार महाजन या तरुणाने सुरु केलेल्या टूर्स व्यवसायाच्या कार्यालयाचे उद्घाटन रविवारी आमदार प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते पार पडले. गेली कांही वर्ष स्वत: मेहनत घेवून हा या व्यवसायात यशस्वी पदार्पण केले. शहराच्या मध्यवर्ती भागात ऐतिहासिक चवदार तळ्याच्या शेजारी हे कार्यालय सुरु करण्यात आले आहे.
महाडमधील तुषार महाजन या तरुणाने आपल्या मेहनतीवर गेली कांही वर्ष स्वत फिरून टूर्स आणि ट्राव्हेल या व्यवसायात जम बसवला आहे. महाडमध्ये विविध पर्यटन सेवा देणाऱ्या नामांकित कंपन्याची कार्यालये असली तरी महाडमधील या तरुण युवकाने विश्वास आणि चांगली सेवा देत या व्यवसायात पदार्पण केले आहे. वीरेश टूर्स आणि ट्रावेल या नावाने हा व्यवसाय सुरु केला असून या व्यवसायाच्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रम रविवारी पार पडला. ऐतिहासिक चवदार तळ्याच्या शेजारीच हे कार्यलय सुरु करण्यात आले असून आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी भाजप चे राजेय भोसले, जयवंत दळवी, विनोद देशमुख, या व्यवसायाचे मालक तुषार महाजन यांच्या पत्नी सौ आरती महाजन, वडील सुधीर महाजन आई सुनिता महाजन, बहिण सौ. अपूर्वा मेनकर आदी मान्यवर उपस्थित होते. तुषार आणि आरती यांच्या वीरेश टूर्स आणि ट्रावेल्स या व्यवसायाच्या माध्यमातून महाड मधील नागरिकांना परदेश पर्यटनाबाबत माहिती, मार्गदर्शन आणि त्या संदर्भात लागणारे व्हिसा बुकिंग, विमा मार्गदर्शन याबरोबर एस्सल वर्ल्ड, इमाजीका यांचे बुकिंग देखील केले जाणार आहे.