पडघ्यातून चार बालकांमगांराची सुटका
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात सुरू असलेल्या लघु उद्योगांच्या आस्थापनेवर बाल मजूरांना अल्प वेतनावर राबवले जात असल्याने महाराष्ट्र चाईल्ड डेव्हलपमेंट लेबर वेल्फेअर या सामाजिक संस्थेने पडघा पोलीस व कामगार अधिकाऱ्यांच्या सोबतीने धाडसत्र राबवून चार बालकामगारांची सुटका केली.आस्थापनेवरील अल्पवयीन बालकांमगांराचे शोषण टाळण्यासाठी महाराष्ट्र चाईल्ड डेव्हलपमेंट लेबर वेल्फेअर ठाणे अंतर्गत पडघा विभागात पाहणी करून धाडसत्र मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महामार्गालगतच्या हाँटेल,गॅरेज,पेव्हर ब्लॉक कारखान्यावर छापे टाकून 14 वर्षाखालील गिड्डू कुमार,ईसरार इस्लाम शहा,शाहीद अहम्मद,सोबर यादव या बालकामगारांची सुटका करून मालकांना बालकामगार न ठेवण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या.यावेळी या मोहीमेसाठी महाराष्ट्र चाईल्ड डेव्हलपमेंट लेबर वेल्फेअर,पडघा पोलिस व कामगार अधिकारी आदींनी संयुक्त कारवाई करून बालकामगारांची सुटका केली.