मोबाईल मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद

कल्याण दि २२ : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला कि लवकर मिळणे मुश्किल असतं.त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय खासगी डेटा लीक होण्याची देखील शक्यता असते. पण कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी गेल्या सहा महिन्यात ४४ मोबाईलचा शोध लावून नागरिकांना परत केले आहेत. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेह-यावर आनंद पसरला आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन, बस स्टँड, न्यायालय, तहसीलदार कार्यालय, सरकारी हॉस्पिटल, बाजारपेठ आदि वर्दळीच्या ठिकाणाहून मागील वर्षभरात नागरिकांच्या मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

या गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अधिकारी अंमलदाराचे एक स्वतंत्र पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने गेल्या सहा महिन्यात गहाळ झालेले साडे पाच लाख रुपये किमतीचे ४४ मोबाईल हस्तगत केले आहेत.

कल्याणचे सहाययक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, दीपक सरोदे यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले .

हरवलेला मोबाईल परत मिळेल याबाबत नागरिकाना विश्वास नव्हता. मात्र सहा महिन्यानंतर मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आंनद पसरला होता. मोबाईल शोधून दिल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *