नाटयकर्मीच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द : महापौर
सहा रंगकर्मीसह पत्रकार शंकर जाधव यांचाही सत्कार
डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरातील नाटयकर्मींच्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिब्ध्द आहेात असे आश्वासन केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आायेजिक कार्यक्रम दिले. यावेळी सहा ज्येष्ठ रंगकर्मीचा आणि रंगभूमीसंदर्भातील समस्या हिरीरीने मांडणारे पत्रकार शंकर जाधव यांचाही सत्कार महापौरांच्या हस्ते करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद डोंबिवली शाखेच्या वतीने रविवारी आनंद बालभवन येथे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सु. श्री. इनामदार, भालचंद्र कोल्हटकर , सुरेश सरदेसाई , रमेश भिडे , विवेक जोशी आणि डॉ. संजय रणदिवे यांचा सत्कार महापौर देवळेकर आणि सभागृहनेते राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डोंबिवलीतील अभिनेता नंदू गाडगीळ , नाटककार प्रवीण शांताराम, आनंद म्हसवेकर, माधव जोशी , मदन जोशी, सुरेश देशपांडे उपस्थित होते. यावेळी महापौर देवळेकर यांनी राज्य हौशी नाट्य स्पर्धा डोंबिवलीतील सावित्रीवाई फुले कलामंदिर येथे होत असल्याचे सांगत ही अभिमानास्पद बाब असल्याचे म्हणाले. या कार्यक्रमात नृत्य या संस्थेच्या स्वप्ना कुंभार देशपांडे आणि आणि ३० नृत्य कलाकार यांनी नांदी ,शिव वंदना, लावणी ,लावणी पाश्चात्य ठेका,गरबा,भोंडला आणि इतर नृत्य प्रकार सादर केले.प्रा डॉ प्रसाद भिड़े तसेच त्यांचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश भिडे यांनी वि. वा. शिरवाडकर – कवी मनाचा नाटककार हा सुंदर कार्यक्रम सादर केला. विनोदी विडंनात्मक संस्कृत नाट्य कदौघ ( संदर्भ कट्यार काळजात घुसली ) लेखक दिग्दर्शक सादरकर्ते युवराज ताम्हणकर आणि सहकारी यानी सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन स्वप्ना कुंभार देशपांडे यांनी केले. यावेळी अध्यक्ष दिलीप गुजर , उपाध्यक्ष भारती ताम्हणकर , कोषाध्यक्ष केतन दुर्वे ,कार्यावाहक निशिकांत रानडे , सदस्य राहुल कामत, सदस्य – दुर्गराज जोशी ,विवेक ताम्हणकर , शुभदा गोडसे , सुवर्णा केळकर , बापू राऊत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!