किल्ले आणि रांगोळी स्पर्धेतून संस्कृती जपण्याचे काम : पोलीस निरीक्षक जंबुरे
रांगोळी आणि किल्ले स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न
कल्याण : किल्ले आणि रांगोळी स्पर्धेतुन आपली संस्कृती जपण्याचे काम केले जात आहे. ह्या स्पर्धेत सहभाग घेऊन मुलांनी चांगले प्रोत्साहन दिले आहे. त्याचा उपयोग मुलांना पुढील भविष्य काळात नक्कीच होईल असे बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल जंबुरे यांनी सांगितले. सचिन शिरसाठ यांनी आयोजित केलेल्या किल्ले आणि रांगोळी स्पर्धेच्या भव्य बक्षीस वितरण कार्यक्रम ते बोलत होते. प्रभागातील मुलांमध्ये आणि महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावी यासाठी बेतुकरपाडा येथील समाजसेवक सचिन शिरसाठ यांनी या परिसरात रांगोळी आणि किल्ले सजावट स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवारी शिशुविकास शाळेच्या पटांगणात पार पडला.
रांगोळीच्या माध्यमातून विश्व शांतीचा संदेश देणाऱ्या शकुंतला बोडके यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले. तर साई बाबा सबका मलिक ही रांगोळी साकारण्यात आलेल्या सोनाली पाटील हिला दृतीय पारितोषिक, स्त्री जन्मास विरोध का ? ही रांगोळी काढलेल्या साक्षी शिरसाठ हिला तृतीय पारितोषिक आणि संस्कार भारती रांगोळीमध्ये शेतकरी आत्महत्याचे चित्र रेखाटनाऱ्या ऋतुजा शिंदे हिला उत्तेजानार्थक पारितोषिक देण्यात आले. तर किल्ले स्पर्धेत पन्हाळागड साकारण्यात आलेल्या मयुरेश गालिंदे ह्याला प्रथम पारितोषिक, काल्पनिक दुर्ग साकारण्यात आलेल्या सिद्धिविनायक मित्र मंडळास दृतीय पारितोषिक, काल्पनिक किल्ल्यासाठी ठाणकरपाडा युवक मित्र मंडळास तृतीय पारितोषिक आणि संजय पांचाळ ह्याला उत्तेजानार्थक पारितोषिक देण्यात आले. समाजसेवक सचिन शिरसाठ हे नेहमी समाजोपयोगी कार्यक्रम राबवत असतात. त्यांनी घेतलेल्या या स्पर्धेबद्दल देखील परिसरात कौतुक होत आहे. यावेळी आयोजक मयूरी शिरसाठ, बाजार समितीचे नंदकुमार देशमुख, रमेश गवळी, मोहन घोलप, नाना पगारे, सुशीला शिरसाठ, संगीता शिरसाठ, अनूप आढळराव, सचिन बोडके, अजिंक्य शेजवळ, नितेश सालकर, अक्षय शिरसाठ, हर्षल भोंडीवले, भूषण बाविस्कार, गीतेश मराठे, कल्पेश मराठे, निलेश अष्टेकर, रोहित गायकवाड़, सहदेव शिरसाठ, रोहित सोनी, राहुल सोनी, सिद्धेश गाडगे, निलेश बाविस्कार, कैलास म्हाडासे, यशोदिप म्हाडासे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.