डोंबिवली, ठाण्यातून एक दिवसात 4 टन प्लास्टिक कचरा गोळा : ऊर्जा फाउंडेशनचे रेकॉर्ड ब्रेक काम
कल्याण : ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने प्लास्टिक कचरा मुक्तीची चळवळ राबविण्यात येत आहे. फाउंडेशनच्या वतीने रविवारी डोंबिवली,ठाण्यात ड्राईव्ह घेण्यात आला यावेळी तब्बल ४ टन प्लास्टीक कचरा जमा झाला. हा सगळा कचरा चार ट्रकमधुन जेजुरी येथे रुद्र संस्थेत पाठविण्यात आला. आतापर्यंत गेल्या ११ महिन्यातील रेकॉर्ड ब्रेक काम झाले आहे.
उर्जा फाउंडेशन ही समविचारी महिलांनी सुरु केलेली नोंदणीकृत स्वयंसेवी सामाजिक संस्था आहे. पर्यावरणाला अतिशय हानिकारक असलेल्या ‘प्लास्टिक’चा वापर कमी करणे, वापरलेले प्लास्टिक कचऱ्यात टाकून न देता ते गोळा करून त्यावर पुनःप्रक्रिया करणे अथवा त्याचा पुनर्वापर करणे यासाठी “कमी वापर-पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया ” या त्रिसूत्रीवर आधारित *माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी ही ऊर्जा फौंडेशन च्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे. रविवारी डोंबिवली केडीऐमसी अॉफीस व ठाणे इटर्नीटी कॉम्पलेक्स जवळ सुमारे 4 टन प्लास्टिक कचरा गोळा झाला. शहरातील सोसायट्यांमध्ये , तसेच शाळा , महाविद्यालये आणि इतर निवासी संकुलांमध्ये जाऊन उर्जाच्या सदस्या याविषयी जनजागृती करतात व वापरलेले प्लास्टिक कचऱ्यात न टाकता दर महिन्याला गोळा करतात. तसेच अनेक शाळा , महाविद्यालये, अनेक सामाजिक संस्था या प्लास्टिक-त्रिसूत्रीचा प्रचार करून त्यांना प्लास्टिक जमा करण्यास साह्य करतात. ह्या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत असून सध्या दरमहा सुमारे १ ते २ टनावर प्लास्टिक गोळा केले जाते. जमा केलेले प्लास्टिक पुनःप्रक्रिया करून इंधन म्हणून वापरता येण्यासाठी पुणे येथिल रुद्र इनव्हॉरमेंटल सोल्युशन्स या संस्थेला पाठवले जाते. रुद्र ही संस्था पर्यावरण स्नेही पद्धतीने इंधन तयार करते. सुरुवातीला फक्त डोंबिवली शहरातंच सुरु झालेल्या उर्जा फाउंडेशनच्या कार्याचा विस्तार आता कल्याण, ठाणे या शहरांपर्यंत झाला आहे. उर्जाच्या ११ व्या माझा प्लास्टिक कचरा हि माझी जबाबदारी या चळवळीला डोंबिवली आणि ठाणेकरांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. वेगवेगळ्या सामाजिक कामात ऊर्जेचे योगदान आहे.
१२ वा प्लास्टीक ड्राइव्ह १७ डिसेंबरला
उर्जाचा 12 वा प्लास्टिक ड्राईव्ह रविवार ,१७ डिसेंबर राेजी डोंबिवली व ठाणे येथे होणार आहे. सकाळी १० ते ११.३० पर्यंत. डोंबिवली केडीऐमसी अॉफीस, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे तर ठाणे- इटर्नीटी कॉम्पलेक्स जवळ,तीन हातनाका , सर्वीस राेड, ठाणे- पश्चिम. येथे हा ड्राईव्ह होणार आहे असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
———-
अतिशय स्तुत्य उपक्रम. मी स्वतः माझ्या मैत्रिणींसह अंबरनाथ येथून डोंबिवली ला प्लॅस्टिक घेऊन आले होते. अंबरनाथ करांची प्लॅस्टिक आणायची ही पहिलीच वेळ होती. यापुढे अंबरनाथ मधे ही चळवळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न राहील.
चांगल्या उपक्रमाला आमच्याकडून नेहमीच प्रसिध्दी दिली जाते आपल्या कोणत्याही बातम्या असतील तर आम्हाला जरूर पाठवा. whattsup no 9821671737
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. मी आणि माझे मिस्टर पर्यावरण प्रेमी असल्यामुळे प्लास्टिक कचऱ्यात टाकताना खूप वाईट वाटायचं पण काही पर्याय नसायचा आणि अचानक 4 महिन्यांपूर्वी कल्याणात प्लास्टिक कचरा गोळा केला जातो हे कळलं. हा उपक्रम कल्याणात श्री कैलास देशपांडे राबवतात असे कळले आणि आम्ही या चळवळीशी जोडले गेलो. श्री कैलास देशपांडे यांचे शतशः आभार
Great initiative,
Similar kind of collection happens in Pune by Keshav Sita trust and Rudra for last 3 years