मुंबई : राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल गुरूवारी हाती आले. महायुती विरूध्द महाविकास आघाडी असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळाला. पाच जागांपैकी तीन जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवल आहे. बालेकिल्ल्यात भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. अवघ्या एका जागेवर भाजपने उषा मिळवले. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीची सरशी तर भाजपची पिछेहाट झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मोठा धक्का समजला जात आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघाचा निकाल प्रथम हाती आला. या मतदार संघात भाजपने विजयश्री खेचून आणली. भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले असून त्यांनी शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. मात्र कोकण वगळता उर्वरित मतदार संघात भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार किरण काळे यांचा पराभव केला आहे. या विजयामुळे विक्रम काळे चौथ्यांदा आमदार झाले आहेत.

अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिगांडे आघाडीवर आहेत. त्यांनी विद्यमान आमदार रणजित पाटील यांना दुसऱ्या फेरीतही पिछाडीवर टाकलंय.

बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव

नागपूरच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं भाजपला धोबीपछाड दिली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार नागो गाणार यांचा काँग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांनी पराभव केला आहे. गाणार गेले १२ वर्षं इथं आमदार होते.

नाशिकमध्ये तांबेंची जीत

नाशिकच्या लढतीकडे सर्वांच लक्ष होतं. या ठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय झाला आहे. काँग्रेसने सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृतपणे उमेदवारी दिली होती, पण ऐनवेळी त्यांच्याऐवजी सत्यजित तांबे यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसनं सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबन केलं. सत्यजित तांबेंवरही कारवाई करण्यात आली. नाशिकमध्ये भाजपनं त्यांचा उमेदवार दिला नव्हता. तसंच भाजपने अधिकृतपणे कुणाला पाठिंबादेखील जाहीर केलेला नव्हता. पण भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र सत्यजित तांबेंना भाजपचे लोक मतदान करतील, असं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *