डोंबिवली : डोंबिवलीनजीक मांगरूळ येथील वनक्षेत्रात लोखंडी जाळीच्या कुंपणामुळे अडकून पडलेल्या रानगवा ची सुखरूपपणे सुटका करण्यात वनविभागाला यश आल आहे. दोन वर्षापूर्वी कोथरूड पुणे येथे मानवी वस्तीत आलेल्या रानगव्यास  नागरिकांच्या अतिउत्साहीपणामुळे जीव गमवावा लागली असल्याची घटना घडली. त्यामुळे 

गेल्या दोन ते तीन दिवसापासून खोणी गावात रानगवा चे दर्शन झाले. त्यानंतर हा रानगवा खासदार श्रीकांत शिंदे यांचे पुढाकाराने वृक्ष लागवड केलेल्या वनक्षेत्रात  मुक्तविहार करत असताना स्थानिक ग्रामस्थांच्या नजरेस पडला. त्यांनी वनविभागास याबाबत कळवले, तात्काळ वनविभागाचे पथक रेस्कु टीमसह जागेवर पोहचले असता सदर वन्यप्राणी हा पूर्ण वाढ झालेला शरीराने धष्टपुष्ट असा अंदाजे 1टन वजनाचा भारतीय रानगवा प्रजातीचा असल्याचे समजले. सदर रोपवणास सर्व बाजूने लोखंडी जाळीचे कुंपण असल्याने या वन्यजीवास बाहेर  पडण्यास अडचण येत असल्याचे वनाधिकारी यांचे लक्षात येताच सर्व पथक पूर्ण दिवसभर रानगव्याच्या हालचालींवर संयमाने लक्ष ठेऊन होते.  हा रानगवा लोकवस्तीच्या दिशेने बाहेर पडला असता तर तो गोंधळून बिथरण्याची शक्यता असल्याने अडकून पडलेल्या रानगव्याला मोकळ्या वनक्षेत्राचे दिशेने  मार्गक्रमण करण्यासाठी  स्थानिक वनाधिकारी यांचे मदतीने वनाधिकारी वैभव वाळिंबे यांचे नेतृत्वाखाली अँक्शन प्लॅन तयार करून जाळीच्या कुंपणाची एक बाजु  पद्धतशीर रीतीने उघडून सदर रानगव्यास जंगल क्षेत्राचे दिशेने कुंपणाबाहेर काढन्यास वनविभागास यश आले आहे.बाहेर पडल्यावर रानगव्याने जवळच असलेल्या तलावातील पाणी स्वछंदपणे पिऊन मलंगगड लगत असलेल्या विस्तीर्ण राखीव वनक्षेत्राच्या दिशेने मार्गक्रमण केले.सुमारे 5 किमी पर्यंत त्याचा मागोवा घेऊन तो लोकवस्तीपासून दूर त्याचे  नैसगिर्क अधिवासात  सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावरच वनविभाग पथकाने सुटकेचा निश्वास सोडला.

 या सर्व कामगिरीत सहा.वनसंरक्षक गिरीजा देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कल्याण व बदलापूर वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ अधिकारी वैभव वाळिंबे, विठ्ठल दरेकर ,रामदास गोरले, राजू शिंदे,अभिमन्यु जाधव व वनरक्षक रवींद्र पाटील, वणवे,रिंगणे .पाटील वनमजुर शेलार ,स्थानिक ग्रामस्थ मयूर भोईर तसेच rescue team पथक वॉर एन जी ओ चे योगेश कांबळे व त्यांचे सहकारी तसेच आपदा व्यवस्थापन टीमचे  सुहास पवार व त्यांचे सहकारी उपस्थित होते.रानगव्यास लोकवस्तीपासून दूर त्याचे नैसर्गिक अधिवासात नेण्यात आल्याने बदलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक नातू यांनी  सर्व पथकाचे कौतुक केले.

रानगव्याचे दर्शन

मुरबाड, कल्याण,बदलापूर तालुक्यातील वनक्षेत्रात रानगवा या प्राण्याचे दर्शन झालेले असून याव्यतिरिक्त बिबटे,सांबर, भेकर, रानडुक्कर, रानमांजर, उदमांजर शा विविध वन्यप्राण्यांचा वावर ठाणे जिल्ह्यात असल्याचे त्यांनी सांगितले.  वन्यप्राणी पक्षी खाद्याचे शोधात वन्यप्राणी लोकवस्तीत आल्यास नागरिकांनीही तेव्हढ्याच जबाबदारीने वागण्याचे गरज असल्याचे मत व्यक्त करून वन्यप्राणी शिकार, वनवणवा, अवैद्य वृक्षतोड,वन अतिक्रमण,माती उत्खनन इत्यादी अवैध बाबीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागास सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!