14 लाखांचा अवैध दारू साठा हस्तगत, दोघांना अटक
कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई;
कल्याण (आकाश गायकवाड) : गोव्याहुन बेकायदेशीरपणे मद्य आणून ते विदेशी दारूच्या बाटल्यामध्ये भरून विकणारे रंजन शेट्टी आणि हिरामण म्हात्रे या दुकलीला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा लावून अटक केली. यांच्याकडून अवैध दारू साठ्यासह दोन गाड्या एक कंटेनर असा मिळून 14 लाख 27 हजरांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजू जॉन आणि त्यांच्या पथकाला गोवा वरून मद्य आणून कल्याण -डोंबिवलीसह ग्रामीण परिसरात मध्ये विक्री करत असल्याची माहिती ख़बरयामार्फ़त मिळाली होती .या माहितीनुसार त्यांनी कल्याण शीळ रोड वर सापळा रचला असता त्यांना एक चारचाकी गाडी संशयास्पद रित्या आढळून आली .पोलिसांनी तात्काळ गाडी थांबवून चौकशी करत रंजन शेट्टी याला ताब्यात घेतले.रंजनची कसून चौकशी करून पोलिसी खाख्या दखविताच त्याने साठ्याबाबत माहिती दिली .त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कल्याण शीळ रोड लगत खोणी गावाच्या जंगलात एक कंटेनर आढळून आला. या कंटेनर मध्ये मद्याचा अवैध साठा असल्याचे निदर्शनास आले पोलिसणी या प्रकरणी हिरामण म्हात्रे याला अटक केली .रंजन व हिरामण हे दोघे गोव्याहून मद्य साठा आणून ते विदेशी बाटल्या मध्ये भरून बेकायदेशीर पणे विकत असल्याचे तपासात उघड झाले हे दारू ते हळदी समारंभात विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Great.. Job..