ठाणे, दि.17 : कासारवडवली वाहतूक उपविभागाचे हद्दीत मुंबई मेट्रो लाईन – 4 चे कासारवडवली ते गायमुख पर्यंत काम चालू आहे. मेट्रो-४ च्या कासारवडवली सिग्नल ते नागलाबंदर सिग्नल पावेतो घोडबंदर रोड, ठाणे यामार्गावरील पिलरवर गर्डर टाकण्याच्या वेळी या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी ठाणे कडून घोडबंदर रोडचे दिशेने जाणारी वाहिनी जड अवजड वाहनांकरिता दि. १७ ते २० जानेवारी या काळात रात्री २३.५५ ते पहाटे ४.०० वाजेपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
वाहतूकील बदल पुढील प्रमाणे आहे.
प्रवेश बंद – १) मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – (अ) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. ब) मुंबई ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – २) मुंबा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिज खालून खारेगाव – टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – ३) नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे ‘प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व वाहने ही मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
जड अवजड वाहने सोडून इतर वाहने ही गर्डर टाकण्याचे वेळी कासारवडवली सिग्नल पेट्रोल पंप कट येथून डावीकडे वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे नागलाबंदर सिग्नल कट जवळ उजवे बाजूस वळण घेवून मुख्य रस्त्यास मिळून इच्छित स्थळी जातील.
१) दि. १७ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत. 2) दि. १८ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. १९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत. 3) दि. १९ जानेवारी २०१३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. २० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ०४.०० वाजे पर्यंत.
ही वाहतूक अधिसूचना ही वर नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होई पर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.