नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करू नये : राज ठाकरे

 रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांनाही तंबी

मुंबई : ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही त्या विषयात चोमडे गिरी करू नये अश्या शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाना पाटेकरांना फटकारले. नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेऊन वक्तव्य केले होते.  तसेच येेत्या दोन दिवसात कोर्टाच्या निर्णयाची प्रत प्रत्येक पोलीस ठाणे वॉर्ड अधिकारी आणि रेल्वे ला देऊन फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी करणार अन्यथा न्यायालयाच्या अवमानाची केस दाखल करण्याचा इशारा राज यांनी दिला.

वांद्रे येथील रंगशारदा येथे मनसेचा मेळावा पार पडला त्यावेळी राज यांनी फेरीवाल्यांची बाजू घेणाऱ्या नानाची नक्कल करीत त्यांच्यावर प्रहार केला. रस्त्यावर काय करायचे हे नानांनी आम्हाला शिकवू नये. मराठी चित्रपटा ना थिएटर मिळत नव्हते तेव्हा हा नाना कुठे गेला होता असा सवाल राज यांनी उपस्थित करीत त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला. यापुढे रस्त्यावर फेरीवाले दिसता काम नये अधिकाऱ्यांनी आपले काम करा. आता हात जोडून सांगतो हात सोडायला लावू नका असा इशारा राज यांनी दिला. सुशांत माळवदे याच्या वरील हल्ला विसरणार नाही आज सगळेच बोलून दाखवत नाही काही गोष्टी मनात ठेवाव्या लागतात असेही राज म्हणाले.

मुंबईत अनधिकृत झोपड्यांना आगी लाऊन तिथे पक्की घरे बांधण्याचा डाव. बेहरामपाड्यातील आग लागली नव्हती लावली गेली.इथल्या झोपडपट्ट्या पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांचे मोहल्ले आहेत, हेच आपल्या अंगावर येतील त्यावेळी माझ्यासकट माझा महाराष्ट्र सैनिक उभा असेलअनधिकृत फेरीवाल्यांच्या आंदोलनात केसेस अंगावर घेणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचं मी अभिनंदन करतो. मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी कितीही केसेस अंगावर आल्या तरी हरकत नाही सत्ता आल्यावर काढून घेऊ असेही राज म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *