डोंबिवली : महापुरूषांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे नते, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांच्या निषेधार्थ डोंबिवलीत रिपब्लिकन सेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली. शाईफेक प्रकरणातील भीमसैनिकांवरील तसेच पत्रकारांवरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे त्वरीत मागे घेण्यात यावे, निलंबीत केलेल्या पोलिसांचे निलंबन मागे घेऊन त्यांना त्वरीत कामावर रूजू करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष (पँथर)आनंद नवसागरे, भीम आर्मीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दामोदर काकडे, रिपब्लिकन सेनेचे अनंत पारदुले, ज्ञानेश्वर खडसे, युवा सेनेचे सुभाषभाऊ शिरसाट, अरुणभाऊ शिरसाट, तुषार बनसोडे, भिमआर्मीचे जयेश मोहिते, अनुज कुमार, बसपाचे खंदारे सर, सतीश बैसाने यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली शहरात संयुक्त निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली रेल्वे स्टेशनजवळील राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली. या वेळेस रिपब्लिकन सेना पार्टी, रिपब्लिकन युवा सेना, बहुजन समाज पार्टी, भिम आर्मी यांच्यावतीने चौकाचौकात निदर्शने करून राज्यपाल भगतसिहं कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्यासह केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. भीम सैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच पोलिसांचे निलंबन रद्द करण्यात यावे अशी मागणी मोर्चात करण्यात आली. या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या काही दिवसात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे ठाणे जिल्हा निमंत्रक तथा कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष (पँथर)आनंद नवसागरे यांनी दिला.
या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जोशी, रिपब्लिकन सेना महिला प्रभारी सुधाताई ढेरे ,परेश जोशी, संजय शिर्के, सुरेश गायकवाड, राजू दिवेकर, जिजाभाऊ गोंडगे, भीमराव खंदारे, सतीश मुळे, नितीन साबळे, सतीश जाधव, सतीश बैसाने, शैलेंद्र नेरकर, सागर निकम, अशोक मोरे, राकेश शिंदे, विशाल कोकाटे, विनोद पंडित आदी कार्यकर्ते मोठया संख्येने मोर्चेत सहभागी झाले होते.