मेळघाट- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत हे आज पासून दोन दिवसाच्या मेळघाट दौऱ्यावर आले आहेत. या दौरयात ते मेळघाटातील चिखलदरा, धारणी या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उप जिल्हा रूग्णालयाची पाहणी करून संपूर्ण आढावा घेत आहेत.
पहिल्याच दिवशी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी आरोग्य यंत्रणेच्या वतीने या भागातील कुपोषण, गरोदर माता मृत्यू, बालमृत्यू यावर प्रभावीपणे कशा उपायोजना राबविण्यात येतील या बाबत आढावा घेत आहेत. पहिल्या दिवशी ते अचलपूर तालुक्यातील बिहाली,सलोना, अमझरी, या प्राथमिक आरोग्य केंद्रास तर उद्या चिखलदरा तालुक्यातील सेमाडोहा, हरिसाल,या ठिकाणी भेट देतील आणी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात वरिष्ठ आधिकारया समवेत संपूर्ण आढवा घेऊन बैठकीस मार्गदर्शन केले. यावेळी या दौरयात आरोग्य विभागातील वरिष्ठ आधिकारी ,जिल्हस्तरावरी आधिकारी यांची प्रमुख उपस्थित होती.