अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे हि निवडणूक चांगलीच रंगतदार बनली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला होणार असून, ८९ मतदार संघात ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. यंदाच्या निवडणुकीत रिंगणात आम आदमी पक्ष रिंगणात उतरल्याने, भाजप, काँग्रेस आणि आप असा तिरंगी लढत पाहावयास मिळणार आहे.
गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागा आहेत. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत विधानसभा निवडणूक होत आहे. गुजरातची विधानसभा निवडणूक यावेळी दोन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान होईल. हे मतदान १ डिसेंबरला पार पडेल. तर, दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबरला ९३ जागांवर मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात कच्छ आणि सौराष्ट्रमधील १९ जिल्हयात मतदान होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे.
गुजरात निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी भाजप नेत्यांनी ताकद लावली. आपचे नेते आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी प्रचारासाठी जोर लावला. तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी प्रचारात आघाडी घेतली. महाराष्ट्रातील नेत्यांवर प्रचारासाठी जबाबदारी टाकली. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, संतोष केणे यांच्यासह अनेक पदाधिका-यांनी जोमाने प्रचारसभा घेतल्या. गुजरातमध्ये पहिल्यांदा तिरंगी लढत होत असल्यानं मतदार कुणाला कौल देणार हे पाहावं लागणार आहे.