२८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर जनसंवाद यात्रा
ठाणे : भारतातील एकात्मिक व वैविध्यपूर्ण नटलेल्या संस्कृतीला तडा देण्याचा व लोकांमध्ये दहशत व भिती निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. संविधानाला धक्का लावून त्याचा मूळ ढाचा बदलण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांच्या या कारवाया हाणून पाडण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्याच्या उध्देशाने, महाराष्ट्रात सर्व पुरोगामी संस्था-संघटनांच्या वतीने ” नफरत छोडो, संविधान बचाओ ! ” ही जनसंवाद यात्रा प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे. ठाणे जिल्हयात सोमवार २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या अभियानात जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार २८ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता भिवंडी निजामपूर महापालिका भिवंडी येथून जनसंवाद यात्रेला सुरूवात होणार आहे. ज्येष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर हे उद्घाटन करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते श्यामदादा गायकवाड हे उपस्थित राहणार आहे.
असा असेल यात्रेचे मार्गक्रमण
सोमवार २८ नोव्हेंबर, २०२२ दुपारी ३ ते रात्री ८
उद्घाटन व जाहीर सभा
मंगळवार २९ नोव्हेंबर, सकाळी ८ ते रात्री ८ वा.
भिवंडी- शेलार- कवाड- कोळीवली- पारिवली -अनगाव (महापोली मुक्काम)
बुधवार ३० नोव्हेंबर, सकाळी ८ ते रात्री ८ वा.
महापोली- चावे -खालिंग -कुरूंद- पडघा- डोहळे (कासणे मुक्काम)
गुरूवार १ डिसेंबर, सकाळी ८ ते रात्री ८ वा.
कासणे -सारमाळ- वासिंद- खातिवली (शहापूर मुक्काम)
शुक्रवार २ डिसेंबर, सकाळी ८ ते रात्री ८ वा
शहापूर- गोठेघर- वाफे- नडगाव- लेनाड- कळगाव (मुरबाड मक्काम)
शनिवार ३ डिसेंबर, सकाळी ८ ते रात्री ८ वा
मुरबाड- देवगाव- सोनिवली- बदलापूर- बेलवली- (अंबरनाथ मुक्काम)
जाहिर सभा सायंकाळी ५ वाजता अंबरनाथ
रविवार ४ डिसेंबर, सकाळी ८ ते रात्री ८ वा.
अंबरनाथ- सम्राट अशेाक नगर- उल्हासनगर- शांतीनगर- अशोकनगर -वालधुनी बुध्दभूमी फाऊंडेशन (मुक्काम वालधुनी )
सोमवार ५ डिसेंबर, सकाळी ८ ते रात्री ८ वा.
कल्याण डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान शिवाजी चौक- दूधनाका-
पारनाका- कळवा वाल्मिक समाज हॉल -फायर ब्रगेड समोर खारटन रोड ठाणे येथे समारोप.
———————