मुंबई : १७ नोव्हेंबर हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दहावा स्मृती दिन !  स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. पण त्यानंतर  उध्दव ठाकरे गटाच्या कार्यकत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळांचं शुध्दीकरण केलं.  त्यानंतर मात्र उध्दव ठाकरे विरूध्द शिंदे गट यांच्यामध्ये वार पलटवार सुरू झालाय,

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यामुळे राज्यातील उध्दव ठाकरेंचे सरकार जाऊन एकनाथ शिंदेंनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेचे थेट दोन गट पडले आहेत. एक म्हणजे ठाकरे गट तर दुसरा शिंदे गट… तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील संघर्ष अनेकवेळा पहावयास मिळाला. त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी हे दोन्ही गट सोडत नाही. 

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिंदे व ठाकरे गटाच्या कार्यकत्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो.  त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपल्या सर्व आमदारांसह आधीच बाळासाहेबांना त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केलं. पण त्यानंतर उध्दव ठाकरे गटाच्या कार्यकत्यांनी स्मृतीस्थळावर जाऊन गोमूत्र शिपंडून शुध्दीकरण केले.

 मुख्यमत्रयांची प्रतिक्रिया …
“बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या दहावा स्मृतीदिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही त्यांना अभिवादन करायला आलोय. हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आठवणीशिवाय एक क्षणही जाणार नाही. ही वस्तूस्थीती आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दिली.

संजय राऊतांची टीका
आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग बाळासाहेबांच्या स्मारकाला हात जोडायला जा  अशी टीका खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!