ठाणे : येथील विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना शुक्रवारी अटक करण्यात आली होती. आज शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावताच जितेंद्र आव्हाडांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला.त्यानंतर न्यायलयाने १५ हजाराच्या कॅश बाँडवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये सुरु असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असतानाच जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह चित्रपटगृहात प्रवेश करून हा शो बंद पाउला होता. त्यावेळी कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये राडा झाला. प्रेक्षकांना मारहाण केल्याचा आरोप आव्हाडांवर करण्यात आला होता याप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी आव्हाड यांना शुक्रवारी अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज कोर्टात हजर करण्यात आले. दोन्ही बाजुंनी जोरदार युक्तीवाद झाला. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.