मुंबई दि. २७ ऑक्टोबर : दिवाळी म्हंटलं की फटाक्यांची आतिषबाजी आलीच. मात्र या फटाक्यांच्या आतिषबाजीचा परिणाम मुंबई ठाणे आणि पुण्यातील हवा गुणवत्तेवर झाल्याचे समोर आलय.  ‘सफर’ या संस्थेने हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले आहे.  दिवाळीत राज्यातील अनेक शहरांत प्रदूषणात वाढ झाल्याचे नोंदविले आहे. त्यामुळे दिवाळीत मुंबई ठाणे आणि पुण्याची हवेतील प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात दिवाळी सण मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला नव्हता. यंदाच्या वर्षी दिवाळी सण उर्त्स्फुतपणे साजरा करण्यात आला आला. फटाके वाजण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याचे निदर्शनास आले. मुंबई ठाणे पुण्यासारख्या मोठया शहरांमध्ये दिवसेंदिवस वायु प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे प्रदूषणात आणखीनच वाढ झाली आहे. वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दिपावली पूर्व व दिपावली कालावधीत (लक्ष्मीपूजन) ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 245 µg/m³ इतके आढळले. तसेच, यादिवशी हवेतील NOx (ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन)चे प्रमाण 56 µg/m³ तर SO2चे (सल्फर डाय ऑक्साईड) प्रमाण 29 µg/m³ इतके होते. त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक १९७ इतका होता.

सर्दी खोकल्याची भिती…
हवेतील धूलीकणांचे प्रमाण वाढल्यास त्याचा कमी रोगप्रतिकारशक्ती असलेल्या नागरिकांना धोका असतो. करोना महामारी आटोक्यात आली असली, तरी पावसाळय़ापासून राज्यभरात दीर्घकाळ सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्याच्या हवेमुळे पुन्हा एकदा सर्दी-खोकल्याची साथ वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच लहान मुलांनी काळजी घेण्याची गरज आहे.
———-

दिवाळीतील हवा गुणवत्ता निर्देशांक किती ?

मुंबई – 221 एक्यूआय
पुणे – 122 एक्यूआय
कल्याण – 163 एक्यूआय
ठाणे – 192 एक्यूआय
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!