तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनीही धरला लावणीवर ठेका

कल्याण, दि. २४ : दीपावलीनिमित्ताने हजारो कल्याणकरांनी सूर व संगीताने मंतरलेली दिवाळी पहाट अनुभवली. भाजपा व कपिल पाटील फौंडेशनतर्फे साई चौकात आयोजित केलेल्या पाच तासांच्या रंगतदार कार्यक्रमात अविस्मरणीय गीते गुणगुणत तरुणाईबरोबरच ज्येष्ठांनीही लावणीवर ठेका धरला. तर विनोदी चुटक्यांवर हास्यांचे फवारे उडाले. चित्रपटसृष्टीतील १३ कलाकारांचा अविष्कार व गायकांचा सूर ऐकून हजारो कल्याणकरांची यंदाची दिवाळी स्मरणीय ठरली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालखंडानंतर झालेल्या दिवाळी पहाटमध्ये नागरिकांचा अपूर्व उत्साह व जोश पाहावयास मिळाला.

आघाडीचा गायक-गायिका अवधुत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्निल बांदोडकर, सावनी रविंद्र यांनी सादर केलेली गीते, अभिनेत्री अमृता खानविलकर व नृत्यांगना नेहा पेंडसे यांचे लावणीनृत्य, हास्य कलाकार गौरव मोरे, नम्रता संभेराव, वनिता खरात, श्याम राजपूत, चेतना भट यांचे विनोदी सादरीकरण आणि डान्स महाराष्ट्राची कलाकार तश्वी भोईर हिचे नृत्य रसिकांच्या पसंतीला उतरले. अव्वल कलाकारांच्या उपस्थितीत सकाळी साडेपाच वाजता झालेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत केला. त्यानंतर सकाळी १० वाजता राज्यगीत जय जय महाराष्ट्र व राष्ट्रगीताने समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!