मुंबई : मराठवाड्यात मागील पंधरा दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत शेतक-यांवर संकट कोसळलय. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उद्या रविवार २३ ऑक्टोबर रोजी संभाजीनगरच्या दौ-यावर जात आहेत.

परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून हाता तोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना तातडीने मदत कशी करता येईल याची पाहणी करण्यासाठी संभाजीनगरच्या दौऱ्यावर जात आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना शासकीय मदत लगेच कशी मिळवून देता येईल यासाठी ते शिवसेनेची यंत्रणा कार्यान्वीत करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!