डोंबिवली : गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात ऑनलाईन लॉटरीचा धुमाकूळ सुरू असून, याकडे महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, रिक्षाचालक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयांचा कर बुडवून ऑनलाईन लॉटरी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मा़त्र विष्णुनगर पोलीसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे
डोंबिवली पश्चिमेत अनेक ठिकाणी ऑनलाईन लॉटरी दुकान सुरू आहेत. रेल्वे स्टेशन परिसरात ही दुकान थाटण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या दुकानाबाहेर राजश्री मशीनचा बोर्ड लावला जात असून राज्य शासनाचा कोणताही कर न भरता बेकायदेशीरपणे ऑनलाईन लॉटरी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. शासनाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सर्व ऑनलाईन सेंटरचे पोलीस यंत्रणेकडून तसेच शासनाच्या संबंधित विभागाकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
तरुणपिढी गुरफटतेय …
ऑनलाईन जुगार खेळाकडे शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुरफटत चालली असून, देशाचे उज्ज्वल भविष्य उध्वस्त होताना दिसत आहे अशी भीती एका जाणकार नागरिकाने व्यक्त केली.
पोलिसांचा कानाडोळा ….
डोंबिवली सारख्या सुशिक्षित व सुसंस्कृत नगरीत सरकारचा कोट्यावधी रुपयांचा कर बुडवून बेकायदेशीरपणे ऑनलाईन लॉटरी कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. विष्णुनगर पोलिसांकडून कानाडोळा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामुळे बेकायदेशीरपणे सुरू असणारे ऑनलाईन लॉटरी सेंटर तातडीने बंद करण्यात यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
**