डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा ३९ वा वर्धापन दिन शनिवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात मोठया उत्साहात पार पडलाण. त्यावेळी पालिका कर्मचा-यांनी स्टेजवरचा ठेका धरला. विशेष म्हणजे एका झिंगाट गाण्यावर केडीएमसीचे  आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनीही ठेका धरल्याने हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून पालिका आयुक्तांच्या झिंगाट नृत्यावरून टीकेचे सूर उमटत आहेत. 
 कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. विकास कामे रखडली आहेत. अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू आहे. यावर प्रशासनाचे कोणतेही लक्ष नसताना आयुक्तांच्या नृत्यावरून सोशल माध्यमांवर सर्वसामान्य कल्याण डोंबिवलीकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या प्रमुखांकडून अशा प्रकारचा डान्स करणे म्हणजे सेवा वर्तवणुक नियमांचा भंग असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी एका जागरूक नागरिकाने नगरविकास विभागाकडे केली आहे. त्यामुळे पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे वादाच्या भोव-यात  सापडले आहेत.  
स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई ने देशातील तिसरे व राज्यातले पहिले शहर म्हणून मान मिळवल्याचा आनंद साजरा करताना केडीएमसी अधिकारी  असा व्हिडिओ ट्विट करीत मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केलीय. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!