सरकारची दीड कोटी रुपयांची फसवणूक
डोंबिवली : शहरात सर्वत्र अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरू असतानाच, डोंबिवली पश्चिमेतील शिवाजीनगर, गावदेवी परिसरात सरकारी जागेतून रस्ता दाखवून टॉवरचे बांधकाम करून शासनाचा सुमारे दीड कोटी रुपये  महसुल बुडवून पालिकेची आणि सरकारची फसवणूक केली जात असल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आलय. शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांनी हे प्रकरण उजेडात आणले असून, या प्रकरणी सखोल चौकशी करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा म्हात्रे यांनी लोकायुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केलाय.
शहरातील विविध समस्येवर आवाज उठवणारे शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी सांगितले की, डोंबिवली पश्चिमेतील शिवाजीनगर जुना सर्व्हे क्रं.345 व नवीन सर्वे क्रं 31 पै व  मौजे गावदेवी सर्व्हे क्रं 158 येथील सात गुंठे जागा सरकारी रस्त्यासाठी असतानाही बिल्डरने टॉवर उभारला आहे. सरकारी जागेतून रस्ता दाखवून बांधकाम करून पालिकेचा सुमारे दीड कोटी रुपयाचा महसूल बुडवायला आहे ११ वर्षापूर्वी सरकारी जागा असल्याचे कारण पुढे करीत परवानगी नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुन्हा परवानगी कशी दिली ? याची सखोल चौकशी करवी अन्यथा आमरण उपोषणाला बसण्याचा   इशारा   माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांनी दिला आहे.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!