मुंबई/प्रतिनिधी : लायन्स क्लब ऑफ चेंबूर राष्ट्रमित्र, या नवीन क्लबचा शुभारंभ आणि पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा देशाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी, लायन्स क्लब्स इंटरनॅशनलचा जिल्हा ३२३१ ए२ चे जिल्हा गव्हर्नर लायन मुकेश तनेजा यांच्या शुभहस्ते मुंबईतील जेवेल्स ऑफ चेंबूर या हॉटेल मध्ये संध्याकाळी थाटात पार पडला. यावेळी जिल्हा गव्हर्नर लायन मुकेश तनेजा यांनी क्लबचे संस्थापक अध्यक्ष लायन ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्यासह क्लबचे सचिव लायन देवराम केदार, खजिनदार लायन प्रभाकर शेळके, प्रथम उपाध्यक्ष लायन सुमन सानप, सेवा कमिटी चे प्रमुख, लायन सचिन श्रीवास्तव यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ दिली.

प्रथम उप जिल्हा गव्हर्नर लायन अमरचंद शर्मा यांनी लायन्स क्लब ऑफ चेंबूर राष्ट्रमित्र च्या सर्व सभासदांना शपथ दिली. द्वितीय उप जिल्हा गव्हर्नर लायन CA मनीष लाडगे आणि माजी जिल्हा गव्हर्नर लायन मनेश्वर नायक यांनी क्लब च्या सर्व पदाधिकाऱ्यांसह सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या. लायन्स क्लब ऑफ चेंबूर राष्ट्रमित्र या क्लबचा प्रायोजक, लायन्स क्लब ऑफ मानखुर्द चे अध्यक्ष लायन आर. पी. शर्मा यांनी स्वागतोपर भाषण केले. या मान्यवरांसोबत व्यासपीठावर जिल्हा सचिव लायन दीपक भुराणी, GMA चे जिल्हा समन्वयक लायन भरत दत्त, तसेच GST जिल्हा समन्वयक व या क्लबचे एक्सटेंशन चेअरपर्सन लायन तेवर मार्टिस, या क्लबचे दुसरे एक्सटेंशन चेअरपर्सन लायन रुपेश मेहता उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास जिल्हा मुख्य सल्लागार लायन सीमा पै, जिल्हा गव्हर्नर यांच्या सुविद्य पत्नी लायन मोहिनी तनेजा, लायन आशा शर्मा, लायन सीमा लाडगे, ट्विनिंगचे जिल्हा समन्वयक लायन प्रवीण भल्ला, साईटफर्स्ट जिल्हा समन्वयक लायन राजेश बालमवार, लायन आर. के. गुप्ता, झोन चेअरपर्सन रिषी ओबेरॉय, लायन दीपक चंद्रशेकरन, लायन रमेश रामचंद्रन व उद्योजक लायन बिरेंद्र यादव यांच्या सह समाजातील प्रतिष्ठित मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी जिल्हा गव्हर्नर लायन मुकेश तनेजा यांच्या हस्ते वैद्यकीय उपचारासाठी विठ्ठल वाघमारे यांना लायन्स क्लब ऑफ चेंबूर राष्ट्रमित्रच्या वतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. सदर कार्यक्राची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली; याप्रसंगी लायन प्राजक्ता शेळके यांनी स्वागत गीत सर केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन लायन रुपेश मेहता यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!