मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व वाडिया हॉस्पिटल आणि डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबीर दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी व १३ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आलं आहे.
शून्य ते १८ वयोगटातील मुलांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत 2D इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे हे मोफत आरोग्य शिबीर बाई जेराबाई वाडिया लहान मुलांचे रुग्णालय, आचार्य दोंदे मार्ग, परळ (पूर्व) मुंबई येथे होणार आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिबिराची वेळ आहे यासाठी पालकांनी खालील वैद्यकीय सहाय्यकांकडे नोंदणी करावी.
🔴 संपर्क/ नाव नोंदणी
वाडिया हॉस्पिटल
शिवकुमार तडकर मो.९७६९६४६०७०
मंगेश चिवटे (कक्ष प्रमुख) मो.८९०७७७६००९
स्वरूप काकडे (वैद्यकीय सहाय्यक) मो.९८५१२३१५१५
प्रसाद सूर्यराव वैद्यकीय सहाय्यक,मो.८९०७७७६०१३