मुंबई : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेआणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील सत्ता संघर्षाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी तिसऱ्यांदा पुढे गेली आहे. 12 ऑगस्ट रोजी होणारी सुनावनी आता थेट 22 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे या सत्ता संघर्षचा फैसला आणखी दहा दिवस लांबणीवर गेला आहे. खरी शिवसेना कुणाची? शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कुणाकडे जाणार यावर हा सुनावणीनंतर निर्णय होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. उद्धव ठाकरे गटाने बंडखोर आमदारांना अपात्र ठरण्याबाबत आणि विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडीबाबतच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. पण यावर सुनावणी होण्यास मुहूर्त लागत नाही. ८ ऑगस्टला यावर सुनावणी होणार होती. त्यानंतर १२ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली होती. आता ही सुनावणी अजून दहा दिवस लांबणीवर पडली आहे