दिल्ली ; द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ प्रदान केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती झाल्या. त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत, सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.

राष्ट्रपतिपदाची शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीट करून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मी –भारताच्या समस्त नागरिकांच्या आशा-आकांक्षा आणि अधिकरांचे प्रतीक असलेल्या या पवित्र संसदेतून सर्व देशवासियांचे -पूर्ण विनम्रतापूर्वक अभिनंदन करते. तुमची आत्मीयता, तुमचा विश्वास आणि तुमचे सहकार्य मला ही नवीन जबाबदारी पार -पाडण्यासाठी शक्ती देतील.”

ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात मुर्मू यांचा जन्म झाला. मुर्मू यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण मूळ -जिल्ह्यातूनच पूर्ण केलं. पुढे भुवनेश्वरमधील रमादेवी महिला महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. आर्ट्स ग्रॅज्युएटचंशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून करिअरला सुरुवात केली आणि काही वर्ष याच क्षेत्रात काम केलं. २० जून १९५८ रोजी जन्मलेल्या मुर्मू यांनी १९९७ मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९९७ मध्ये पहिल्यांदा त्या नगरसेविका बनल्या. त्यानंतर त्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्ष बनल्या.


ओडिशातील रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून त्या दोनदा भाजपच्या आमदार झाल्या. त्यानंतर २००० ते २००४ दरम्यान सरकारमध्ये मंत्रीही झाल्या. त्यांची वाणिज्य आणि वाहतूक मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्या ओडिशाच्या मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास राज्यमंत्री बनल्या. पुढे त्यांनी विभानसभा निवडणुकीत पाऊल ठेवलं. त्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने त्यांना २०१५ मध्ये झारखंडच्या राज्यपाल म्हणून निवडलं. मागील वर्षी २०२१ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!