डोंबिवलीत फेरीवाल्यांमागील अर्थकारण उजेडात ?
हळबे- सरखोतांची एकमेकांवर टिका 
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेकडून फेरीवाल्यांवर धडक कारवाई सुरू आहे मात्र या कारवाईस फेरीवाल्यांनी विरोध दर्शविला आहे. पालिका प्रशासन ते विरोधी पक्षनेत्यापर्यंत आर्थिक व्यवहार होत असल्याचा आरोप फेरीवाल्यांचे नेते प्रशांत सरखोत यांनी केलाय. तर विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनीही फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे सरखोतांचा व्याजाचा व्यवसाय बंद पडणार असल्यानेच नैराश्येतून ते आरोप करीत असल्याची टिका केलीय. या आरोपा प्रत्यारोपांमुळे डोंबिवलीतील फेरीवाल्यांमागील अर्थव्यवहार उजेडात येत असल्याचे दिसून येत आहे.

रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात कारवाई करावी यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केडीएमसी आयुक्त पी वेलारासू यांची भेट घेतली. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे. ही कारवाई अन्यायकारक असल्याने त्या विरोधात पुढील दिशा ठरविण्यासाठी कष्टकरी हॉकर्स आणि भाजी विक्रेता युनियनतफेर् जाहीर मेळावा घेण्यात आला होता. त्या मेळाव्यात सरखोत यांनी पालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांच्यावर हल्ला चढवीत ते फेरीवाल्यांकडून हप्ते घेत असून त्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप केला. आता राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार ? असा सवालही त्यांनी केला. मात्र सरखोतांच्या आरोपाचा हळबे यांनी इन्कार केलाय. सरखोत हे चालवित असलेल्या पतपेढीतून फेरीवाल्यांना व्याजाने पैसे देतात. फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याने सरखोत यांचा व्याजाचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याच नैराश्येतून त्यांनी हे आरोप केल्याचे हळबे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले. सरखोत यांनी फेरीवाल्यांच्या नावावर गोळा केलेल्या पैशांचा हिशोब द्यावा, मग माझयावर आरोप करावेत असेही हळबे यांनी स्पष्ट केलयं. दरम्यान फेरिवाले नेते व विरोधी पक्षांमध्ये जुंपली असताना दुसरीकडे सत्ताधारी व प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे.

३ नोव्हेंबरला जेल भरो आंदोलन
फेरीवाल्यांविरोधात केडीएमसीची कारवाई ही हिटलरशाहरप्रमाणे सुरू आहे. त्यामुळे त्या विरोधात ३ नोव्हेंबरला महापालिकेवर मोर्चा काढून जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती कष्टकरी हॉकर्स आणि भाजी विक्रेते युनियनने घेतलाय.

काय म्हणाले सरखोत पहा व्हिडीओ 

मंदार हळबे यांच पत्र 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *