डोंबिवली :  भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजन केले जाते. भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. त्याच प्रमाणे डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( अरुणोदय) शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. शाळा, कॉलेज, व्यवसायक्षेत्रातील शिष्य या दिवशी आपल्या गुरूंची कृतज्ञता व्यक्त करतात. वर्षभर अथवा आयुष्यभर गुरूनी दिलेल्या ज्ञान आणि मार्गदर्शनामुळे शिष्य जीवनात यशस्वी होत असतात. गुरू हे ईश्वराचे रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरू रूपाने आपल्या जीवनाचे सारथ्य करत आहे अशी ज्या शिष्याची भावना असते. त्या शिष्याची जीवनात लवकर प्रगती होते. शिक्षक अथवा गुरूंनी शिकवलेले ज्ञान आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा ते प्रयत्न करत असतात. 

स्वामी विवेकानंद शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त साहित्य विज्ञान मंडळ उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!