ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचा-यांनी घेतली भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ
ठाणे : राज्य शासनाच्या वतीने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताह अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी तसेच कर्मचारीवर्गाने सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारचे निर्मुलन करण्यासाठी सर्वतोपरी कार्य करू अशी शपथ घेतली. आज यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी) चंद्रकांत पवार , शिक्षणाधिकारी मीना यादव , कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल बनसोडे आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. दरम्यान ठाणे जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ जरी घेतली असली तरी या शपथ कार्यक्रमामुळे खरच भ्रष्टाचार निर्मुलन होईल का ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.