मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात कथित बंड पुकारल्यानंतर पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन बडतर्फ केलं आहे. अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. एकनाथ शिदेंनी कथित बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं घेतला हा सर्वात मोठा निर्णय आहे.
. मंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर ‘नॉट रिचेबल’ आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा राजकीय भूकंप घडवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिंदेंना २५ ते ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे.
विधानसभेच्या गटनेता पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवण्यात आलं आहे. शिवसेनेनं केलेल्या या कारवाईमुळे आता शिवसेना एकनाथ शिदेंविरोधात कठोर कारवाईच्या भूमिकेत असल्याचे संकेत देण्याबरोबरच या कारवाईमुळे शिंदे आता शिवसेनेमध्ये राहणार की नाही याबद्दलच्या चर्चांना पुन्हा नव्याने उधाण आलं आहे