पनवेल : रोडपाली येथील ज्येष्ठ रहिवासी चिंदुबाई पदू गायकवाड यांचे गुरूवारी वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्या ९० वर्षाच्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते शाम गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत्या. तर रिपब्लिकन सेनेचे कळंबोली शहर अध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या त्या आजी होत्या.
पनवेल तालुक्यातील रोडपाली बौध्दवाडा येथे चिंदुबाई परिवारासह राहत होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्या आजारी होत्या. अखेर गुरूवारी त्यांची प्राणज्योत मालवली. रोडपाली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले त्यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. तरूण वयातच पतीच्या निधनानंतर खचून न जाता मोठया धैर्याने काबाडकष्ट करून त्यांनी तीन मुलांचा सांभाळ केला. त्या अत्यंत कडक शिस्तीच्या तसेच प्रेमळ स्वभावाच्या होत्या. स्वच्छता आणि टापटीप राहणीमानाला अधिक महत्व देत असत. वयाच्या ९० व्या वर्षीही कुटूंबामध्ये त्यांचा दरारा होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, विवाहित मुलगी, सून, नातवडं, नातसून, पणतु असा मोठा परिवार आहे. त्यांचा पुण्यानुमोदन आणि शोकसभा कार्यक्रम मंगळवार दि १७ मे २०२२ रोजी राहत्या घरी होणार आहे.