सरकारविरोधातील काँग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनाला आजपासून अहमदनगरमधून सुरूवात
मुबई : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या तीन वर्षांच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आजपासून अहमदनगर येथून जनआक्रोश आंदोलन सुरू होत आहे. दुपारी ३ वाजता समाजकल्याण ग्राउंड, सावेडी नाक्याजवळ, नगर-मनमाड रोड, अहमदनगर येथे जनआक्रोश मेेळावा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.