ठाणे : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पाच महापालिकांची प्रभाग रचना जाहीर झालीय.  ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई उल्हासनगर व वसई विरार महापालिकांमध्ये प्रत्येकी ११ नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे  बहुतेक सर्वच प्रभागात सीमांकन बदलण्यात आले आहेत, त्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना निवडणूक आयोगाने मागवल्या आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

ठाण्यात आत १४२ नगरसेवक…. 
ठाणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या १४२ होणार आहे. कोपरी, पाचपाखाडी, कळवा, मुंब्रा, दिवा येथे नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. प्रभागांची संख्या ३३ वरून ४७ झाली आहे. महापालिकेत १३१ नगरसेवक  होते.  ४ नगरसेवकांचे एक पॅनेल यानुसार २०१९ ची निवडणूक पार पडली. आता ३ नगरसेवकांचे एक पॅनेल असणार आहे. कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रासह दिव्यातही ४७ ऐवजी ५२ नगरसेवक असणार आहेत. ठाणे, कोपरी, पाचपाखाडी, ओवळा माजीवडा या विधानसभा मतदार क्षेत्रात ८४ नगरसेवकांची संख्या ९० झाली आहे्.  सर्व ठिकाणी तीन नगरसेवकांचे एक पॅनेल असले, तरी प्रभाग क्र ४४ हा सर्वात मोठा प्रभाग ठरला आहे. या ठिकाणी ४ नगरसेवक निवडूण जाणार आहेत. ठाण्यात ७१ महिला निवडून जाणार असून, अनुसचित जातीसाठी १० जागा, अनुसुचित जमातीसाठी ३ तर सर्वसाधारण गटासाठी १२९ जागा आहेत.

नवी मुंबईत  ४१ पॅनेल, १२२ नगरसेवक 
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक २०१५ ची निवडणूक प्रभाग पध्दतीने झाली होती. त्यावेळी १११ प्रभाग होते. नव्या प्रभाग रचनेनुसार  पॅनल पध्दतीने निवडणूक होणार असून, नगसेवकांची संख्या १२२ असणार आहे. एक ते ४० क्रमांकाच्या पॅनेलमध्ये प्रत्येकी तीन तर ४१ प्रभागात दोन नगरसेवकांचा समावेश असणार आहे. नव्या प्रभाग रचनेत ऐरोलीत नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. महिलांसाठी ६१ प्रभाग राखीव असणार आहेत. अनुसुचित जातीचे १० तर अनुसुचित जमातीचे २ नगरसेवक असणार आहेत.

वसई विरारमध्ये ४२ प्रभाग, १२६ नगरसेवक …
वसई विरार महापालिकेत नव्या प्रभाग रचनेत ११५ नगरसेवकावरून आता १२६ नगरसेवक होणार आहेत. एकूण ४२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत, महिलांसाठी ६३ जागा राखीव असून, त्यातील अनुसुचित जाती आणि जमातीसाठी प्रत्येकी ३ जागा राखीव आहेत. 

उल्हासनगरात ३० प्रभाग, ८९ नगरसेवक …..
उल्हासनगर महापालिकेत सध्या २० प्रभाग असून, नव्याने ३० प्रभाग झाले आहेत.  त्यामुळे नगरसेवकांची संख्या ७८ वरून ८९ झाली आहे.  . त्यावेळी ७८ नगरसेवक निवडून आले होते नव्या पध्दतीने व वाढीव लोकसंख्येच्या आधारे ११ सदस्य संख्या वाढणार आहे ३० प्रभागात ८९ नगरसेवक असणार आहेत. तीन सदस्यांचे २९ प्रभाग तर दोन सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे.

कल्याण डोंबिवलीत ४१ पॅनेल,  १३३ नगरसेवक
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेनुसार ४३ प्रभागात तीन नगरसेवकांचे तर एका प्रभागात चार नगरसेवकांचे पॅनल असणार आहे त्यामुळे नगरसेवकांची संख्या  १२२ वरून १३३  होणार आहे त्यापैकी ६७ महिलांसाठी राखीव असणार आहेत तर सर्वसाधारण गटासाठी ११६ जागा,  अनुसुचित जातीसाठी १३ तर अनुसुचित जमातीसाठी ४ जागा राखीव असणार आहेत. 
 ————————
महापालिका  सध्याचे नगरसेवक संख्या  वाढलेले नगरसेवक  लोकसंख्या 


ठाणे                      १३१        १४२          १८ लाख ४१ हजार  ४८८

कल्याण डोंबिवली          १२२      १३३          १५ लाख १८ हजार ७६३

नवी मुंबई                        १११        १२२            ११ लाख २० हजार ५४७

वसई विरार                      ११५        १२६        १२ लाख ३४ जार ६९०

उल्हासनगर                     ७८          ८९          ५ लाख ६ हजार ९८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *