दिल्ली-जेएनपीटी हायवेमुळे दिल्ली ते मुंबई अंतर अवघ्या 12 तासात ……
कल्याण : दिल्ली ते जेएनपीटी हायवेचे काम सध्या सुरु सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासात पार करता येणार तसेच हायवेमार्गे अवजड वाहने शहराच्या बाहेरुन मार्गस्थ होणार असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असा विश्वास केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी आज व्यक्त केला. कल्याणच्या सुभेदार वाडा कट्ट्याच्या वतीने आयोजित स्वर्गीय नेते राम कापसे व्याख्यानमालेमध्ये नितीन गडकरी यांनी ऑनलाईन संवाद साधला
कल्याण मध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित स्वर्गीय नेते राम कापसे व्याख्यानमालेमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिताना वाहतूक व्यवस्थेमध्ये होणाऱ्या बदला बाबत माहिती दिली . यावेळी संवाद साधताना गडकरी यांनी मुबंई नजीक नवी मुंबई विमानतळ येथे विमानतळ होतेय त्या दृष्टीने वॉटर टॅक्सी हा प्रकल्प तयार केला आहे. दक्षिण मुंबईतील लोकांनी बीपीटीत यायचे आणि आठ सीटर वॉटर टॅक्सी बसले तर 13 मिनिटात नवी मुंबई एअरपोर्ट गाठत येणार आहे. त्या एअरपोर्टवरुन ठाणे, कल्याणला ही वॉटर जोडता येईल असे सांगितलं .
गडकरी म्हणाले की, देशाला पुढे नेण्यासाठी उद्योग आणि शेती अधिक विकसीत करावी लागेल ,त्यासाठी पाणी, इंधन, वाहतूकीची साधणे आणि कम्यूनिकेशन यात नवनवे प्रयोग करावे लागतील. रस्ते आणि रेल्वे वाहतूकीपेक्षा जलवाहतूकीचा खर्च कमी आहे. ग्रीन इंधन तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होईल. तसेच शेतकऱ्याचा फायदा होईल. एलएनजी, सीएनजी इंधनावर चालणारी वाहने तयार करण्यासाठी विविध कंपन्या पुढे येत आहेत. बायो एलएनजी, सीएनजी तयार करण्याच्या योजनेवर मोठय़ा प्रमाणात काम सुरु आहे. ई वाहनाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. ई वाहनामुळे प्रति किलोमीट प्रवास खर्च कमी होईल. ई हायवे आणि ग्रीन हायवे तयार केली जातील. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन वेळीच बचत होईल. तसेच लॉजीस्टीकवर होणारा खर्चाची बचत होण्यास मदत होईल. तंत्रज्ञानाचा वापर करुन देशाच्या सर्वागीण विकासासाठी काम केले पाहिजे असे गडकरी यांनी स्पष्ट केलं
आणि ते राहून गेले …..
नागपूरच्या धर्तीवर रोड, त्याच्यावर ब्रीज, त्यावर मेट्रो असे बांधले असले तर रोड झाले असते. वेस्टर्न बायपास इस्टर्न बायपासची कॅपॅसिटी डबल झाली असती. देवेंद्र म्हणाले की, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण ते राहून गेले ही बाब गडकरी यांनी नमूद केली .