कल्याण : गेल्या २५ वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणा़या कल्याणातील एका वृत्तपत्र विक्रेत्याची हातगाडी तोडण्याचा प्रताप पालिकेच्या कर्मचा-यांनी केला आहे. मुंबई, ठाण्यात वृत्तपत्र विक्रेत्यावर कारवाई करू नये असे पालिकेचे धोरण असतानाच, कल्याण डोंबिवलीतील वृत्तपत्र विक्रेत्यांवर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे
कल्याण डोंबिवली शहरात पदपथ अडविणा़-या दुकानदारांवर आणि रस्ता अडवून बसणा-या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिका कर्मचा-यांकडून डोळेझाक केली जाते, मात्र वाहतुकीस कोणताही अडथळा न ठरणा-या वृत्तपत्र विक्रेत्यावर अशा पध्दती कारवाई केल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांकडून पालिकेच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला जात आहे
कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड येथील गणेश टॉवरसमोर विलास आणि मंगला कांगणे हे दांम्पत्य गेल्या २५ वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करीत आहेत एका हातगाडीवर ते वृत्तपत्र विक्रीसाठी ठेवतात मात्र २७ जानेवारी २०२२ या दिवशी त्यांना कोणतेही पूर्वसूचना न देता सायंकाळी सहा- साडेसहाच्या सुमारास केडीएमसीच्या कर्मचा़-यांनी त्यांच्या हातगाडीवर कारवाई केली. विशेष म्हणजे गाडीची खूप वाईट पध्दतीने तोडफोड केली. या गाडीमुळे वाहतुकीला कोणताही अडथळा नाही. किंवा इतर कुणालाही त्रास होत नाही, असे असंतानाही केडीएमसीने हातगाडीवर कारवाई केल्याने कांगणे कुटूंबिय नाराज झाले आहेत. या कारवाई याविषयी केडीएमसी कर्मचा-यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून अरेरावी करण्यात आल्याचे कांगणे यांनी सांगितले
गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे आर्थिक केांडीला सामोरे जावे लागले त्यातच वृत्तपत्र विक्रीतून कसाबसा उदरनिर्वाह करीत आहोत मात्र अशा पध्दतीने पालिकेकडून हातगाडी पूर्णपणे तोडून टाकल्याने आम्हाला मानसिक त्रास झाला असून पालिकेने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती कांगणे यांनी केलीय