ठाणे :  बायोमेट्रिक पॉझ मशीनवर अंगठा घेऊन  शिधावाटप दुकानातून शिधा वितरित करण्यात येत होता. आता शिधावाटप दुकानदारांना शिधापत्रक धारकाच्या गृहभेटी घेणे अनिवार्य करण्यात आली आहे. गृहभेटीच्या नावाखाली शिधावाटप अधिकारी शिधावाटप दुकानदारांवर कारवाई करीत आहेत. तेव्हा शिधापत्रक धारकाच्या गृहभेटीची अट रद्द करावी अशी मागणी मुंबई शिधावाटप घाऊक, किरकोळ दुकानदार संघटना अध्यक्ष केशवजी देढिया यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
     

   सर्वसामान्य शिधापत्रक धारकाला शिधावाटप दुकानावर शिधापत्रक दाखवून स्वस्त धान्य वितरित करण्यात येत होते. त्यानंतर २०१७ पासून बायोमेट्रिक पोझ मशीनवर अंगठा घेऊन शिधावाटप दुकानावर शिधापत्र दाहरकाना धान्य देणे सुरु केले. आता शिधावाटप दुकानदाराने बायोमेट्रिक मशीनवर अंगठा घेऊन नंतर शिधापत्रक धारकाच्या घरी भेट देणे अनिवार्य केले आहे. या गृहभेटीच्या आडोशाला मात्र शिधावाटप नियंत्रण अधिकारी, शिधावाटप अधिकारी हे छळवणूक आणि नाहक त्रास देत कारवाई करीत आहेत. ही जाचक आत रद्द करण्याची मागणी मुंबई शिधावाटप घाऊक, किरकोळ दुकानदार संघटना अध्यक्ष केशवजी देढिया यांनी  अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.

 ————————
  शिधावाटप अधिकारी तपासणीच्या नावाखाली गृहभेटी देणे. घरोघरी भेटी देऊन ई- पॉज मशिनवर अंगठ्याचे उसे घेतल्यानंतरही दुकानादारावर अपहार लादणे. दरमहा हप्ता देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारांविरुध्द पोलीस कारवाई करणे गुन्हे दाखल करणे. मुळात ई- पॉज मशिनवर शिधापत्रिक धारकाचा अंगठा ठसा जुळल्यानंतर स्वतंत्रारित्या गृहभेटीची आवश्यकता काय ? या जाचक अटीचा फायदा आणि छळवणूक करण्यात येत आहे. 
             – केशवजी देढिया(अध्यक्ष –  मुंबई शिधावाटप घाऊक, किरकोळ दुकानदार संघटना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *